कोणत्याही प्रकारची औषधे न घेता आपली प्रकृती उत्तम ठेवता येते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. आदर्श भोजन प्रणाली आपण अमलात आणली तर आपले आरोग्य सुंदर राहू शकते आपण दीर्घायुष्य काढू शकता. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषध घेण्याची अजिबात गरज नाही. पण लोकांचा यावर विश्वास बसत नाही. कारण लोकांना रेडिमेड डॉक्टर पाहिजेत. रेडिमेड दवाखाने पाहिजेत आणि महागडा उपचार पाहिजे.
तुम्ही जेव्हा औषधे घेता तेव्हा तुमची प्रकृती चांगली होते असे तुम्हाला वाटते पण त्या औषधांचा साईड इफेक्ट तुम्हाला दुसऱ्या आजाराकडे घेऊन जातो. अतिशय गंभीर आजार असेल तर डॉक्टरांकडे जाणे औषधे घेणे हे मान्य आहे .परंतु मधुमेह रक्तदाब वजन यासाठी किंवा तत्सम आजारासाठी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे नाही.
आदर्श आहार पद्धतीचा आपण जर अवलंब केला तर आपली प्रकृती ठणठणीत राहू शकते. यासाठी उत्तर प्रदेश मधील मेरठ येथील आय ए एस एस ही संस्था काम करीत आहे. या संस्थेचे डॉक्टर संपूर्ण भारतामध्ये 365 दिवस शिबिरे घेतात. त्यासाठी डॉक्टर मंडळी कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च किंवा मानधन घेत नाही तर. ही शिबिरे एक दिवसाची तीन दिवसांची किंवा सात दिवसांची असतात.
अशाच प्रकारचे एक शिबीर येत्या 14 15 व 16 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या बडनेरा रोडवरील महेश भवन मध्ये आयोजित केले आहे. त्यासाठी मेरठ वरून तज्ञ मार्गदर्शक श्रीमती श्यामादिदी येणार आहेत. हे शिबीर जर आपण केले तर आपले मधुमेह रक्तदाब वजन यावर फक्त तीन दिवसातच चांगला फरक पडलेला असेल.
या तीन दिवसांच्या शिबिराचा खर्च फक्त पंधराशे रुपये आहे. त्यामध्ये ज्यूस अल्पोपहार भोजन नैसर्गिक चहा दुपारचा अल्पोपहार सलाड याचा समावेश आहे. अमरावतीच्या निरोग या संस्थेने या शिबिराचे आयोजन केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मी या आदर्श भोजन प्रणालीचा वापर करीत आहे त्यामुळे मी आजारीच पडत नाही हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. तुम्हाला ताप आला असेल तुम्हाला खूप सर्दी झाली असेल तुमचे वजन वाढले असेल तुम्हाला मधुमेहाचा विकार जडलेला असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होत असेल तर ह्या आदर्श भोजन प्रणालीमुळे तुमचा हा संपूर्ण आजार कोणत्याही प्रकारचे औषध न घेता दुरुस्त होऊ शकतो .फक्त त्यावर विश्वास ठेवणे व त्यासाठी तीन दिवसांचे किंवा सात दिवसांचे शिबीर करणे गरजेचे असते.
अनेक वेळा विनामूल्य शिबिरे सांगण्यात येतात. प्रत्यक्ष त्या शिबिरामध्ये तुम्हाला काहीतरी उत्पादने घ्यायला बाध्य केले जाते .बरेचशे छुपे खर्च असतात. काही संस्था अशा आहेत की त्या भरपूर जाहिरात करतात आणि एका दिवसाला दहा हजार रुपये इतके प्रचंड शुल्क आकारतात. बरे दहा हजार रुपये भरून तुम्ही शिबिरात एक दिवस जाऊ शकत नाही तर त्यांचे पाच दिवसाचे पॅकेज असते म्हणजे झाले 50 हजार. त्याबरोबर भरमसाठ औषधे .भरमसाठ उत्पादने तुमच्यावर लादण्यात येतात ते वेगळेच.
आपण साधे उदाहरण घेऊ या. पशुपक्षी जनावरे फार कमी आजारी पडतात. कारण ते निसर्गावर जगतात. निसर्गातील झाडपाला खातात. माणूस मात्र सतत काहीतरी खात राहतो. बरे घरचे खाल्ले तर ठीक पण तुम्ही जेव्हा रस्त्यावरचे बाहेरचे खाता तेव्हा त्यामुळे खूप आजार तुम्ही विकत घेऊन येता .
परवा सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले श्री तुकाराम मुंढे यांनी यावर सविस्तर भाष्य केलेले आहे. ते म्हणतात की तुम्ही म्हणता मी हे खाल्ले नाही मी ते खाल्ले नाही मग आजार कसा झाला. कॅन्सर कसा झाला. तर त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही लहानपणापासून जे दूध पिता जे वेगवेगळे उत्पादने खाता ती तुम्ही कधी तपासली आहेत का ? त्यातून थोडा थोडा आजार तुमचा बळावत जातो आणि मग त्याचे रूपांतर गंभीर आजारात होते. आपण भेसळयुक्त पदार्थ सातत्याने खातो .दूध देखील भेसळयुक्त आहे ते आता आपल्याला आता कळले आहे. पण या सर्व गोष्टी पासून आपल्याला मुक्तता प्राप्त करायची असेल तर अशा प्रकारची आरोग्य शिबिरे आपण केली पाहिजेत. कोणत्याही डॉक्टरकडे गेले तर तुम्हाला डॉक्टरची फीस तपासण्या औषधे याला एका दिवसाला किमान दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो.
आय ए एस एस ची ही शिबिरे असतात त्यामध्ये येणारे तज्ञ मार्गदर्शक कुठले प्रकारचे मानधन घेत नाहीत. पण तुमच्या त्या शिबिरातील ज्यूस अल्पोपहार सलाड फळफळावळ दुपारचा अल्पपहार आणि जेवण यावर होणाऱ्या खर्चासाठी नाममात्र पाचशे रुपये प्रतिदिन एवढे अल्प शुल्क घेतले जाते. आणि माझा विश्वास आहे की आपण जर हे शिबीर केले तर आपण निश्चितच आपले आरोग्य दीर्घायुष्य करू शकाल. चला तर मग येऊ या अमरावतीच्या बडनेरा रोडवरील महेश भवनमध्ये 14 15 व 16 ऑगस्टला.
डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
