You are currently viewing संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शेर्ले केंद्र शाळेत विविध उपक्रम
Oplus_16908288

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शेर्ले केंद्र शाळेत विविध उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, वृक्षरोप व ओळखपत्रांचे वाटप; शाळेला पंखे व भिंतीवरील घड्याळांची भेट

सावंतवाडी / शेर्ले : सन्माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा नं. १, शेर्ले येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, वृक्षरोप तसेच ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी पंखा व भिंतीवरील घड्याळे भेट देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी तालुका प्रमुख श्री. बबन राणे, माजी सरपंच श्री. उदय धुरी, श्री. दयानंद धुरी, सरपंच सौ. प्रांजल जाधव, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ. श्रावणी धुरी, शालेय समिती अध्यक्ष श्री. प्रशांत जाधव, उपाध्यक्ष सौ. उत्कर्षां केरकर, मुख्याध्यापक श्री. कराड सर व शिक्षकवृंद, तसेच श्री. शांताराम धुरी, अनिल पिंगुळकर (शाखाप्रमुख), साहिल खोबरेकर (युवासेना उपतालुकाप्रमुख), धुरी बाई आणि श्री. बाबा धुरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा