आमदार दीपकभाई केसरकर व आमदार निलेशजी राणे यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी :
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि शिवसेना पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
