You are currently viewing मणेराजुरी येथे अक्कमहादेवी महिला मंडळाची स्थापना
Oplus_16908288

मणेराजुरी येथे अक्कमहादेवी महिला मंडळाची स्थापना

सांगली (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

मणेराजुरी येथे माळी समाज कार्यालया मधे आज झालेल्या बहुसंख्य महिलांच्या उपस्थिती मधे अक्कमहादेवी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली.

मंडळाच्या प्रथम अध्यक्ष पदासाठी सुजाता म्हेत्रे, उपाध्यक्षपदी साक्षी कलढोणे तर सचिव पदी अर्चना लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली. सहसचिव पदी अस्मिता एरंडोले, खजिनदार – निशिगंधा बेडगे, सहाय्यक खजिनदार गौरी करगणे यांना सर्वानुमते नियुक्त करण्यात आले.

मणेराजुरी पंचायत समिती गटाच्या पंचायत समिती सदस्य संगीता लांडगे तसेच शिवप्रसाद महिला मंडळ सांगली च्या अध्यक्ष सुरेखा कलढोणे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली.

सल्लागार मंडळामध्ये कल्पना चौगुले,संगीता लांडगे सुरेखा कलढोणे, रंजना बेडगे आणि सुनीता म्हेत्रे यांना निवडण्यात आले.

मंडळाच्या निवडीसाठी बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. संचालक मंडळ आणि सदस्य अशी पंचावन्न जणींची कार्यकारणी तयार करण्यात आली.

शिवप्रसाद महिला मंडळ सांगली च्या विद्यमान अध्यक्षा सुरेखा कलढोणे यांनी सर्व नवनियुक्त संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा