बी.एस्सी. नर्सिंगमध्ये जानवी सासोलकर प्रथम
८६.५ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश; नगरसेविका ज्योती जाधव यांच्याकडून अभिनंदन
दोडामार्ग :
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग, तोंडवली, ता. कणकवली येथे बी.एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील विद्यार्थिनी जानवी जयंद्रथ सासोलकर हिने ८६.५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जानवीच्या या यशाबद्दल कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. ज्योती रमाकांत जाधव यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जानवीचे वडील तथा राज्य परिवहन, कुडाळ आगारचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक जयंद्रथ विष्णू सासोलकर, आई सौ. जागृती जयंद्रथ सासोलकर, जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्गचे माजी सदस्य रमाकांत जाधव, प्रकाश कांबळे व सौ. प्रगती कांबळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जानवीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जानवीने मिळवलेल्या या यशामुळे सासोली गावासह दोडामार्ग तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात तिच्या कामगिरीची विशेष दखल घेतली जात आहे.
