*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. संध्या कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावणातील पाऊस*
(*मनभावन*)
*अष्टाक्षरी*
संपे आषाढ महिना
जाई पाऊस पडून
पहा आलाच श्रावण
सूर्य सोबती घेऊन..!!
येता श्रावण साजिरा
प्रफुल्लित तन मन
निसर्गाची हिरवाई
ओलेचिंब होता वन..!!
ऋतू हा मनभावन
शालू हिरवा नेसून
जणू वसुंधरा येई
साज शृंगार लेवून..!!
ऊन पावसाचा खेळ
नभी चमत्कार जसे
सप्तरंगी इंद्रधनू
मधूनच दिसतसे..!!
राजा सणांचा श्रावण
मुलीबाळी येती खास
करी सर्वजण हर्षे
पूजा व्रत उपवास..!!
*सौ संध्या कुलकर्णी सातारा*
