*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी बापट लिखित अष्टाक्षरी काव्यरचना*
*स्वातंत्र्याचा उपभोग*
स्वातंत्र्याने घेता आला
छोट्या गोष्टीचा आनंद
आयुष्यात जपुयात
आवडते असे छंद।।१
स्वातंत्र्याचा उपभोग
मनसोक्त घेऊयात
बलिदान ते वीरांचे
स्मरणात ठेवुयात।।२
स्वातंत्र्याने आपल्याला
मुक्त जगा शिकवले
मनी आलेले ते सारे
बोलण्यास सांगितले।।३
पंख स्वप्नांना देऊन
उंच घेण्यास उभारी
शिकवले बेधडक
राहण्याची ती तयारी।।४
दिला मतदान हक्क
घेऊ शकतो आपण
व्यवसाय आवडीचा
जपा स्वातंत्र्याचा क्षण ।।५
*स्वातंत्र्याचा उपभोग*
मुक्ती गुलामगिरीची
दुसऱ्याचा मान ठेवू
चाड ठेवा कायद्याची।।६
*सौ मानसी बापट बंगलोर*
