मानव साधन विकास संस्थेच्या वतीने प्रोजेक्ट संजीवनी या अँबुलन्स शुभारंभ प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी दिल्या शुभेच्छा !!!
कुडाळ, सिंधुदुर्ग
कोकणभूमीचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेशजी प्रभू साहेब हे देशासाठी एक संपत्ती आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य आणि त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, हे आमचे भाग्य आहे.
‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ उपक्रमाचा शुभारंभ आज कुडाळ येथे कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मा. श्री. सुरेशजी प्रभू साहेब, मानव साधन विकास संस्था, अध्यक्षा सौ. उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्यासह डॉक्टर व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आरोग्यसेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या सेवाभावी उपक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सौ.उमा प्रभु व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांना पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .
