*देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे उल्लेखनीय यश!*
सावंतवाडी
ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी अशा तिन्हीं गटांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता पाचवी ते सातवी या गटात शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर इयत्ता आठवी ते दहावी या गटात तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे प्रभावी आणि सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या विद्यार्थ्यांना सहशिक्षिका श्रीम. वेदिका सावंत, श्रीम. श्रृती जोशी व गायन -वादन कलेमध्ये पारंगत असलेले शिक्षक श्री. भूषण परब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सह-संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.
