*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी बापट लिखित नाट्यछटा*
*नाट्यछटा*
अहो आई, भरभर आवरा आज आपल्याला *माझ्या कॉलेज च्या संमेलनात जायचे आहे तिथे स्पर्धा आहे ना सासू सून जोडी नंबर १*
हो हो, टोमणे नका मारू ऐकायला आलेय मला तुम्ही काय बोलताय ते, रोज सकाळी सकाळी माझ्या सात पिढ्या खाली आणता तुम्ही आणि मी बोलायला लागले की मग उलट कांगावा करता, जाऊ दे आज आवरून जाऊया पहिला नंबर आपलाच यायला हवा हं आणि तिकडे उत्तरे नीट द्या उगीच तिरकस बोलणे नको बर का, घरी आल्यावर बोला काय बोलायचे ते.
मीच काय बडबडत बसलेय निघायला हवे चारुचा फोन आला ये लवकर म्हणून.
झाले बाई आवरून एकदाचे अहो आईचे चला पटपट निघुया.
स्पर्धा सुरू झाली आणि आला की आपला नंबर देवा माझ्या सासू ला बुद्धी दे बाबा नीट उत्तरे द्यायची,
झाली बाबा एकदाची स्पर्धा हुश्श..
आता निकाल आणि तेव्हढ्यात स्पर्धेत पहिला नंबर मिळाला आहे कल्याणी आणि तिच्या सासूबाईंना असे सांगितले.
इतक्या दिवसाची मेहनत आज फळाला आली थँक्स सासूबाई म्हणजे आपण एकमेकींना सांभाळून ही घेऊ शकतो तर.. मला वाटायचं काय रोज रोज वाद होतात पण नाही अशा स्पर्धा रोज झाल्या तर? मग आमचे भांडण च होणार नाही.
आई चला आज आपण दोघीच पार्टी ला जायचंय मी घरी कळवले आहे.
*मानसी बापट बंगलोर*
