You are currently viewing सखी संगतीने

सखी संगतीने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

वृत्त:भुजंगप्रयात

 

*सखी संगतीने* 

————————————-

 

 

ऋ्तूंचे क्रमाने असे येत जाणे

नव्याने फुलांचे दिसावे बहाणे

कधी होतं जावी उन्हे पावसाची

कधी संगतीने वदावे उखाणे

 

पहाटे पहाटे सुगंधात न्हावे

कधी आठवावी ऋतूची लबाडी

जरा जोर येता उन्हाला नव्याने

अजूनी स्मरावी नभांची चहाडी

 

कधी अंगणी या सरी कोसळाव्या

कधी सायलीला फुलावे धुमारे

तुझ्या सेज भेटी हळू जाग येता

जुईपुष्प देती नव्याने इशारे

 

जरी दूर गेला अता पावसाळा

तरी आज थोडे फुलावे पिसारे

सुगंधात न्हावी सुनी बाग माझी

तुझ्या सोबतीने झुलावेत वारे

 

श्रीनिवास गडकरी

बावधन पुणे

@सर्व हक्क सुरक्षित

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

बारा ऑगस्ट सहव्विस

प्रतिक्रिया व्यक्त करा