You are currently viewing टोमॅटो सार

टोमॅटो सार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मानसी बापट लिखित पाककृती*

 

*टोमॅटो सार*

 

साहित्य..

मध्यम आकाराचे ६ टोमॅटो, 1 छोटे भांडे ताक थोडेसे आंबट, डाळीचे पीठ 1 चमचा,लाल तिखट 1 चमचा, फोडणीसाठी कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि लाल मिरच्या अंदाजे,तेल, कोथिंबीर धुवून चिरून अंदाजे चवीनुसार मीठ,साखर चवीनुसार

 

कृती..

प्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे दोन भाग करून पातेल्यात पाणी घालून त्यात शिजवून घ्यावे.

गार झाल्यावर शिजलेले टोमॅटो मिक्सरमधून बारीक करावेत.

आता हे मिश्रण गाळून झाल्यावर ते गार करून त्यात ताक मिक्स करावे.

मग त्यात 1 चमचा डाळीचे पीठ घालून चांगले हलवावे.

साखर, मीठ अंदाजानुसार घालून ठेवावे.आता कढई मध्ये तेल घालून फोडणी करावी.

मग त्यात हे तयार केलेले मिश्रण घालून एकसारखे ढवळावे.

उकळी आली की गॅस बंद करावा.वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.आपले टोमॅटो सार तय्यार

ह्यात आवडत असल्यास ओले खोबरे, आले लसूण आणि हिरवी मिरची वाटून घातले तरी चालते.

 

सौ मानसी बापट बंगलोर

प्रतिक्रिया व्यक्त करा