विद्यामंदिर हरकुळ खुर्दच्या गुणवंत विद्यार्थ्यांना अजितराव नाडकर्णी यांच्याकडून बक्षिसे
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक; पालक व शिक्षकांची उपस्थिती
हरकुळ खुर्द :
विद्यामंदिर हरकुळ खुर्द प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. अजितराव नाडकर्णी यांच्या वतीने गौरव करण्यात आला. प्रशालेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांक – कु. आदिती सुभाष रासम, द्वितीय क्रमांक – कु. आर्या भिकाजी रासम, तर तृतीय क्रमांक – कु. गौरी प्रशांत घाडीगावकर यांनी यश संपादन केले. या तिन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
हा बक्षीस वितरण कार्यक्रम श्री. अजितराव नाडकर्णी यांच्या दुकानात उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक श्री. सुभाष रासम व श्री. भिकाजी रासम तसेच प्रशालेचे शिक्षक श्री. संजय पवार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांचा गौरव केल्याबद्दल विद्यामंदिर हरकुळ खुर्द प्रशालेच्या वतीने श्री. अजितराव नाडकर्णी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
