*राजस्थानमधील रंगप्रक्रिया उद्योग प्रदुषणबंदीच्या विळख्यात अडकल्याने विट्यातील यंत्रमाग उद्योग ठप्प*
विटा शहरातील यंत्रमागावर उत्पादीत होणारे ग्रे पॅापलीन कापड रंग प्रक्रियेकरीता राजस्थानमधील पाली व बालोत्रा येथे जात असते.या ठिकाणी रंगप्रक्रिया करणारे अनेक कारखाने गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असुन तो त्याठिकाणी पारंपारीक व मोठा रोजगार निर्माण करणारा लघुउद्योग म्हणुन मान्यता पावलेला आहे.
सदर रंगप्रक्रिया कारखान्यातील बाहेर सोडण्यात येणारे केमिकलयुक्त सांडपाणी त्याठिकाणच्या लुणी नदीमध्ये मिसळत असल्याने प्रदूषण होत असल्याची तक्रार गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे.या पार्श्वभुमीवर त्या ठिकाणच्या रंगप्रक्रिया उद्योजकांनी वैयक्तीक किंवा कॅामन सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवील्या आहेत.तरीही तीन महिण्यापुर्वी याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीवरच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने याबाबतीत कठोर निर्णय घेत, जोवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुर्णपणाने कार्यान्वित होत नाहीत तोवर सर्व रंगप्रक्रिया कारखाने बंद करण्याचा आदेश पारीत केला आहे.त्यावेळेपासुन गेले दोन तीन महिणे हे रंगप्रक्रिया कारखाने बंद असल्याने याठिकाणी विटा, इचलकरंजी, मालेगांव या यंत्रमाग केंद्रातील रंगकामासाठी येणाऱ्या कापडाचे प्रचंड साठे पडुन आहेत व यामुळे कापड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कापड खरेदी व डिलिव्हरी घेणे बंद केले आहे.
त्याचा परीणाम म्हणुन यंत्रमागधारकांकडे देखील उत्पादीत कापडाचे साठे वाढले असुन नाईलाजास्तव यंत्रमागधारकांना कापड उत्पादन थांबवावे लागले आहे.याचा भाग म्हणुन विटा शहरातील यंत्रमाग गेल्या पंधरा दिवसांपासुन अंशतः व काही ठिकाणी पुर्णपणे बंद करावे लागले आहेत.शहरातील पांच हजार यंत्रमागावरील कापड उत्पादन ठप्प झाले असुन दररोजचे सुमारे एक कोटी रुपयांचे साडेतीनलाख मीटर कापड उत्पादन थांबले आहे.तर सुमारे एक हजार कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे.
असाच परीणाम मालेगांव येथील सुमारे एक लाख व इचलकरंजीतील सुमारे ४० ते ५० हजार यंत्रमागावर झाला असुन कापड उत्पादन व रोजगार प्रभावीत झाले आहेत.
याचा परीणाम म्हणुन कापडासाठी लागणाऱ्या कॅाटन सुताची मागणी थंडावली असून त्यामुळे सुत गिरण्यांकडील तयार सुताचे साठे पण वाढु लागलेत.या सर्वांचा एकत्रीत परीणाम म्हणुन यंत्रमाग व सुत गिरण्यांच्या व्यवस्थापणामध्ये मोठी चिंता निर्माण झाली असुन हजारो कामगार बेकार होण्याच्या मार्गावर आहेत.याबाबतीमध्ये विटा यंत्रमाग संघासह मालेगांव, इचलकरंजी येथील यंत्रमाग संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री व वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदन दिले असुन शासनाने राजस्थान शासनाशी संपर्क करुन या प्रश्नामध्ये आवश्यक उपाययेजनेद्वारे सर्वोच्च न्यायालयातून मार्ग काढुन घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.महाराष्ट्र शासनानाही याची दखल घेऊन राजस्थान शासन व त्याठिकाणच्या मुख्यमंत्री महेदयांशी संपर्क करुन याबाबतीमध्यं तातडीने उपाययोजना करुन राजस्थान व महाराष्ट्रातील थांबलेला वस्त्रोद्योग पुन्हा सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.महाराष्ट्र व राजस्थानातील वस्त्रोद्योग वियवसायीकांनी या संकटातून मार्ग निघण्याची प्रतिक्षा आहे. ही माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली.
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त महाविद्यालये
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
संपर्क : 9421154594 9421230915 9405071319
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*. *देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
संपर्क : 8600879426 7588868705
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
अभ्यासक्रम.
कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
संपर्क: 9421154594 7588868705
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
कॉलेज व्हिडिओ
https://youtu.be/STjqIuIBdmU?feature=shared
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*खालील संकेतस्थळावरती जाऊन आपण आपल्या कॉलेज चा पर्यायी नंबर 11165,11311, 15196 टाकून प्रवेश निश्चित करू शकता.*
https://auth-2026.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal-2026.maharashtracet.org%2F&state=4e898dd9-f749-436d-b3e1-3417f5632f77&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=9a40d12f-fa5a-4b43-b7f0-762fb2b9ded5
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/209787/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
