You are currently viewing आदिवासी विकास विभागात शिक्षकांच्या 613 पदांची भरती

आदिवासी विकास विभागात शिक्षकांच्या 613 पदांची भरती

दिवासी विकास विभागात शिक्षकांच्या 613 पदांची भरती

सिंधुदुर्गनगरी

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळांमधील पैसा व नॉन-पेसा क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) संवर्गातील रिक्त 613 पदे पवित्र पोर्टलद्वारे 100 टक्के भरण्यात येणार आहेत.

            या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्या तसेच पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने प्राधान्यक्रम मागविण्यात येत आहेत.

            भरतीमध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 308, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 30, माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) 159, माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 4 आणि उच्च माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) 116 पदांचा समावेश आहे.

            या पदासाठी सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच अराखीव प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी  https://tait2025.mahateacherrecruitment.org.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंद करावी.  

        दि. 6 ऑगस्ट 2026 पासून उमेदवारांना प्राधान्यक्रम Generate करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राधान्यक्रम Lock करण्यासाठी दि. 6 ते 11 ऑगस्ट 2026 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

            भरतीची सविस्तर जाहिरात आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टल तसेच आदिवासी विकास विभागाचे संकेतस्थळ यांना भेट द्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा