You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा ०९ ऑगस्टला

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा ०९ ऑगस्टला

सावंतवाडी:

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे तालुकाध्यक्ष दीपक पटेकर व सचिव राजू तावडे यांनी केले आहे.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२५/२६ आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक वाचून त्यास मान्यता देणे, तसेच आर्थिक वर्षातील जमाखर्चास मंजुरी देणे यावर चर्चा होणार आहे. याशिवाय आगामी वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत चर्चा करून निर्णय घेणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा