सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (गॅस) ग्राहकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्व एलपीजी ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस वितरकाशी संपर्क साधून अथवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी. त्यासाठी एचपीसीएल ग्राहकांनी HP Pay, बीपीसीएल ग्राहकांनी Hello BPCL, तर आयओसीएल ग्राहकांनी IndianOil ONE या अधिकृत मोबाईल ॲपचा वापर करावा.
विहित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तेल विपणन कंपन्यांच्या नियमांनुसार ग्राहकांना घरपोच एलपीजी सिलिंडरचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व एलपीजी ग्राहकांनी १६ ऑगस्ट २०२६ पूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
