*जागतिक साकव्य विकास मंच, काव्य निनाद साहित्य मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आषाढ घन*
आषाढ घनांनी नभात केली दाटी ।
मी विरहात इथे तुझ्यास्तव कष्टी ।।१।।
हे नभ भरले काळ्या कुट्ट ढगांनी
इंद्रधनुष्य झळके सप्त रंगानी ।।२।।
आषाढ सरी रिमझिम बरसती।।
जलाशयही तुडुंब भरून वाहती ।।३।
आषाढ घनांनी ही धरती सुखावली।
आनंदाने शालू हिरवा नेसली।।४।।
वनराणी झालेली संतुष्ट पाहूनी
मोर नाचतो हिरव्या कंचवनानी।।५।।
हर्षात धावती ढग नभी वेगात ।
आनंद दाटे कवी जन हृदयात।।६।।
कधी लखलखते वीज चमकते
पावसात नवयुवती बघ शहारते।।७।।
असते ऊन, कधी जोर पावसाचा
खेळ चालतो जणू पाठशिवणीचा ।।८।।
किती वाट पाहिली आषाढ सरींची।
आषाढ नभ पाहे तृप्ती या मनाची।।९।।
आषाढ घनांचे कौतुक रसिकांना।
पूर्णत्व मिळतसे कविच्या स्वप्नांना ।।१०।।
प्रतिभा पिटके
अमरावती
