You are currently viewing उद्या मालवण बंदर ते सिंधुदुर्ग किल्ला जलप्रवासी सेवेच्या उद्देशपत्र वितरणाचा समारंभ

उद्या मालवण बंदर ते सिंधुदुर्ग किल्ला जलप्रवासी सेवेच्या उद्देशपत्र वितरणाचा समारंभ

नारायण राणे, नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण / प्रतिनिधी :

मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर नियमित प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्देशपत्र वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता देवबाग भवन, मालवण येथे करण्यात आले आहे.

या समारंभाला माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर नियमित प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे. या सेवेमुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ जलप्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, मालवणच्या पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा प्रकल्प साकार झाल्यानंतर ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार असल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा