You are currently viewing सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे

सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे

सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे

नवीन कार्यकारणीची एकमताने निवड; विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नवीन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारणीत उपाध्यक्षपदी प्रेमानंद देसाई, सचिवपदी सुहास गावडे, सहसचिवपदी सचिन बागवे व अशोक परब, तर खजिनदारपदी स्टीव्हन डिसिल्वा यांची निवड करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी म्हणून संयोगिता काळकुंद्रीकर यांची, तर संघटक सचिव म्हणून बाबुराव मुळीक, श्रीकांत आरोंदेकर, प्रशांत पेडणेकर आणि महादेव सावंत यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून आनंद रासम, विनायक दळवी, संदीप राऊळ, अमर गावडे आणि दिगंबर गायतोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
या सभेच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, निवडणूक निरीक्षक दयानंद उबाळे व विजय घाडी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष विनायक दळवी, सचिव संतोष राणे आणि खजिनदार कालिदास बर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बैठकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा