You are currently viewing महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम

 पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा होणार गौरव

सिंधुदुर्ग

भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक प्रशासनापर्यंत महसूल विभागाने लोकाभिमुख शासनव्यवस्थेचा कणा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत आहे. या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात महसूल दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे राहणार असून, महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, विधानसभा सदस्य दीपक केसरकर,  निलेश राणे, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे,  मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर  तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा