कणकवलीत प्लास्टिक बंदीची धडक कारवाई; ७ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांवर नगरपंचायतीची दंडात्मक कारवाई
कणकवली :
प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कणकवली नगरपंचायतीने मंगळवारी आठवडा बाजारात धडक कारवाई करत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
आठवडा बाजारातील अनेक व्यापारी ग्राहकांना बंदी असलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या देत असल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बाजार परिसरात तपासणी मोहीम राबवून संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली.
या कारवाईदरम्यान सुमारे ७ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक बंदीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा नगरपंचायतीने दिला आहे.
