You are currently viewing ओसरगाव टोल नाक्यावर रविवारी शांततापूर्ण निषेध आंदोलन; विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करणार

ओसरगाव टोल नाक्यावर रविवारी शांततापूर्ण निषेध आंदोलन; विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करणार

ओसरगाव टोल नाक्यावर रविवारी शांततापूर्ण निषेध आंदोलन; विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करणार

जंतर-मंतरवरील लाठीचार्जाचा निषेध, विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त; सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे आवाहन

ओसरगाव :

ओसरगाव व बोर्डवे येथील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ११ वाजता ओसरगाव टोल नाका येथे शांततापूर्ण निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील तरुण पिढी, शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी समाजसेवक सोनम वांगचूक यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाचा निषेध करण्यात येणार असून, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीला तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
या आंदोलनात विद्यार्थी, युवक, पालक तसेच ओसरगाव व बोर्डवे येथील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेच्या मार्गाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा