You are currently viewing तिलारी धरणातून २४ जुलैपासून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग

तिलारी धरणातून २४ जुलैपासून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग :

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ जुलै २०२६ पासून नियमानुसार अतिरिक्त पाणी तिलारी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे तसेच इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा