You are currently viewing कळसुलीत अजित पवार यांची जयंती उत्साहात; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कळसुलीत अजित पवार यांची जयंती उत्साहात; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कळसुलीत अजित पवार यांची जयंती उत्साहात; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कणकवली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कळसुली ग्रामपंचायत परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये , माजी युवक ज़िलाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक ,ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम र समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. यावेळी केवळ वृक्षारोपण न करता त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची सामूहिक शपथही घेण्यात आली. पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला सरपंच सचिन पारधीये, उपसरपंच राजेंद्र दळवी, माजी सरपंच अतुल दळवी, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक, नंदकिशोर परब, ग्रामपंचायत सदस्या भावना तावडे, सोसायटी संचालक बाबाजी मुरकर, ग्रामसेवक प्रशांत वर्धम, अरुण दळवी, काका धरणकर, तातू गावंकर, दीपक मेस्त्री, स्वप्नील गोसावी, बाबू लाड, सागर शिर्के, आर्यन शिर्के, यशंवत देसाई, चंद्रशेखर चव्हाण, अक्षय मुरकर, प्रसाद भोगले, मोहन दळवी, तुषार दळवी, शत्रुघ्न परब, मधुकर चव्हाण, मंगेश दळवी, सुलभा कदम, सदानंद पुजारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत अशा समाजोपयोगी उपक्रमांची भविष्यातही सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा