You are currently viewing सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Oplus_16908288

सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

मालवण :

मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राजकोट मित्रमंडळाच्या वतीने रविवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत दैवज्ञ भवन येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजातील रक्ताचा तुटवडा दूर व्हावा, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने या संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“रक्तदान करा, जीवनदान द्या” हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच परिसरातील नागरिक व ज्येष्ठांसाठी मोफत नेत्रतपासणी व तज्ज्ञांचा सल्लाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राजकोट मित्रमंडळाच्या वतीने सर्व नागरिक, युवक-युवती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याबरोबरच आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा