You are currently viewing कोलझरचे ज्येष्ठ नागरिक मेघश्याम गोपाळ देसाई यांचे निधन

कोलझरचे ज्येष्ठ नागरिक मेघश्याम गोपाळ देसाई यांचे निधन

कोलझरचे ज्येष्ठ नागरिक मेघश्याम गोपाळ देसाई यांचे निधन

वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास; आज सकाळी ११ वाजता कोलझर येथे अंत्यसंस्कार

दोडामार्ग, प्रतिनिधी :

दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावातील ज्येष्ठ नागरिक मेघश्याम गोपाळ देसाई (आण्णा) यांचे गुरुवार, दि. १६ जुलै रोजी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
गावातील ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे कोलझर गावावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्यावर आज, गुरुवार दि. १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोलझर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मेघश्याम गोपाळ देसाई (आण्णा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रतिक्रिया व्यक्त करा