You are currently viewing स्मार्ट मीटर विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – वीज ग्राहक संघटनेचा आरोप

स्मार्ट मीटर विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – वीज ग्राहक संघटनेचा आरोप

सिंधुदुर्ग :

नव्याने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मीटरला जिल्ह्यातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. भरमसाठ वीज बिल, खासगी कंपनीचा हस्तक्षेप आणि जबरदस्तीने मीटर बसवणे याविरोधात आवाज उठवणाऱ्यांवरच आता गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप वीज ग्राहक संघटना, वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय गावडे यांनी केला आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने वेंगुर्लेकर यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 35(3) अंतर्गत नोटीस बजावली आहे. “स्मार्ट मीटरमध्ये गुप्त कॅमेरे आहेत” असा दिशाभूल करणारा मजकूर पसरवला म्हणून त्यांच्यावर FIR क्र. 43/2026 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना 15 जुलै 2026 रोजी नवी मुंबई येथील नोडल सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

*”जनतेची दिशाभूल नाही, प्रश्न विचारणे गुन्हा आहे का?”*  

यावर प्रतिक्रिया देताना संजय गावडे म्हणाले, “आम्ही जनतेचा आवाज आहोत. स्मार्ट मीटर नको म्हणून ग्राहकांनी वीज वितरणकडे लेखी अर्ज केले आहेत. पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही. उलट अदानीला स्मार्ट मीटर बसवायचे आहेत म्हणून विरोध करणाऱ्यांवर केस टाकून भीती निर्माण केली जात आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “वीज वितरणचे वाघ साहेब सुद्धा स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा नाही हे लेखी मान्य करत नाहीत. मग आमच्या शंका चुकीच्या कशा? जबरदस्तीने मीटर बसवणे आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे हे लोकशाहीला मारक आहे.”

*संजय गावडे* यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. “अदानी कंपनीसाठी सरकार आणि प्रशासन एकत्र येऊन जनतेचा आवाज दाबत आहे. भरमसाठ बिलांमुळे आधीच त्रस्त असलेल्या जनतेला आता पोलिसांच्या भीतीने गप्प बसवले जात आहे,” असे ते म्हणाले.

वीज ग्राहक संघटनेने या नोटीसीचा निषेध करत म्हटले आहे की, जोपर्यंत जनतेच्या शंकांचे निरसन होत नाही आणि सक्ती थांबत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटरविरोधी आंदोलन सुरूच राहाणार.

स्मार्ट मीटरला विरोध केला म्हणून FIR?

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांना सायबर पोलिसांची नोटीस.

कारण: “स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा आहे” असे सांगितले.

आरोप: अदानीला मीटर बसवण्यासाठी जनतेचा आवाज दाबला जातोय.

जनतेची मागणी: जबरदस्ती थांबवा, भरमसाठ बिलांचा खुलासा द्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा