You are currently viewing मला काही सांगायचंय…

मला काही सांगायचंय…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*मला काही सांगायचंय…*

 

बायांनो,मुलींनो तरुणींनो….

खरंच मला काही पोटतिडकेने सांगायचं आहे….तू आधी विदुषी होती..पण नंतर काळाप्रमाणे,सत्ता,आक्रमणे,यामुळे माजघरातच गेलीस.‌..गुणवत्ता,शिक्षण,बुद्धिमत्ता सारं इतिहास जमा झालं आणि केवळ भोगवस्तू व पुरूषाची दासी झालीस‌.काहींनी बंड केली,क्षमता दाखवल्या त्यांचं कतृत्व पुरषी सत्तेतही अबाधित राहिलं.इतिहासात अजरामर झाल्या….

सावित्रीबाईंनी हाती लेखणी देत पुन्हा महिलांना सजग केलं…शिकल्या,उच्चशिक्षित झाल्या,सर्व कार्यक्षेत्रे पुरषांच्या बरोबरीने कर्तृत्व दाखवत पादाक्रांत केले.स्वाभिमान शिकलीस‌…तू स्वतंत्र अस्तित्व समाजात निर्माण केलंस‌.

पण हळूहळू तू बदलू लागलीस,स्वातंत्र्य म्हणजे स्वैरता तुला वाटू लागली.सत्ता पैसा हाती आला.स्वाभिमानाची जागा

अरेरावीने कुठे कुठे घेतली.

पेहराव,खाणं,वागणं सर्वांतच बदल घडू लागले.संस्कार मोडीत निघाले निघत आहेत.त्यातच पाश्च्यात्य विचारांचा पगडा व अनुकरण….संयुक्त कुटुंब कधीचेच विभक्त…संयम उरला नाही.आतातर व्यसनांच्याही आहारी चाललीस.काळवेळ रात्र काळोख विसरली.घडू नये ते घडू लागलं…कपड्यात अंगप्रदर्शन सामान्य झालं.एवढंच करून थांबली नाहीसतर गुन्हेगारीकडेही सराईतपणे वळलीस….बघ हा प्रवास‌ तुझा..‌

म्हणून वाटतं मी तुला काही सांगू इच्छिते…बये थांब तिथेच आता..विचार कर जरा.‌‌…स्वत:चा मानसन्मान जप..इतरांच्या नजरेला आदर जप.पदराची प्रतिष्ठा ठेव.एक जबाबदार व्यक्ती आहेस तू.‌पिढी घडवणारी.आदर्श ठेव त्यांच्या समोर…सांगावसं खूप वाटतंय पण पाणी पुलाखालून वाहून चाललंय,मी सांगतेय पण ते अरण्यरूदन न ठरो..एवढीच ईच्छा!!

 

अरुणा दुद्दलवार✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा