You are currently viewing ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांचे निधन; देवगडच्या पत्रकारितेवर शोककळा

ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांचे निधन; देवगडच्या पत्रकारितेवर शोककळा

ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांचे निधन; देवगडच्या पत्रकारितेवर शोककळा

देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष; निर्भीड, अभ्यासू व दिलदार व्यक्तिमत्त्व हरपल्याने सर्व स्तरांतून हळहळ

देवगड

देवगड तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरवणारी घटना सोमवारी घडली. देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांचे सोमवारी (१३ जुलै) चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.
दयानंद मांगले यांनी अनेक वर्षे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पत्रकारिता करत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. अभ्यासू वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि सर्वांना आपलेसे करणारा दिलदार स्वभाव यामुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रासह समाजातही वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. “दिलदार मित्र हरपला” अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणा, पुतणी, बहीण आणि भावोजी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने देवगडच्या पत्रकारितेत निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नसल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याची, निर्भीड पत्रकारितेची आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाची आठवण कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा