You are currently viewing जाऊ वारीला

जाऊ वारीला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जाऊ वारीला..*

 

जाऊ वारीला वारीला वारीला पावलांनं

पायात नाही हो नाही हो नाही हो पायताण

जाऊ वारीला वारीला वारीला पावलानं..

 

वारी विठ्ठल विठ्ठल, भक्तीचा डोंगर

टाळ मुदंग मृदंग नामाचा जागर

विठ्ठल पावतो पावतो पावतो नवसानं..

जाऊ वारीला वारीला …

 

जय जय विठ्ठल गोविंद हरे गोविंद राम

नाम मुखात मुखात घडले चारी धाम

तुळशीहार तो गळ्यात विसरले भान..

जाऊ वारीला वारीला..

 

ध्यानी विठ्ठल विठ्ठल मनात विठ्ठल

उचल उचल उचल पाऊल बेगीनं

त्याच्या वाचून वाचून आधाराला कोण..

जाऊ वारीला वारीला ..

 

जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल

जय जय विठ्ठल…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा