*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ये रे ये रे तू ये रे पावसा..*
ये रे ये रे ये ये रे पावसा
साऱ्या सृष्टीला तुझा भरोसा
ये रे ये रे ये ये रे पावसा…
तू येताच हासती झाडे
आणि डुलतात बघ लाडे लाडे
कांती तेजाळे दिसते सतेज
दंबबिंदूंचा चढतो साज
बा रे रुसलास तू असा कसा
ये रे ये रे तू ये रे पावसा…
तुझ्यामुळेच टरारे कोंभ
नको जाऊस तू असा लांब
तूच वैभव सृष्टीचे सारे
ये ना घेऊन सोबत वारे
झारी ओत ना तू भसा भसा..
ये रे ये रे तू ये रे पावसा…
हिरवाईची ती नवलाई
ये ना घेऊन तू लवलाही
पिके डोलू दे डोलू दे शिवार
हिरव्या शालूत टंच जवार
दान देऊन जा पसा पसा..
ये रे ये रे तू ये रे पावसा…
तूच बरकत तूच पायली
सदा असू दे तुझी सावली
नको तापवू तू असे ऊन
सृष्टी निघाली बघ भाजून
मनमानी करतो असाकसा..
ये रे ये रे तू ये रे पावसा…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
*👇अभ्यासक्रम*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
*संपर्क : 8600879426 7588868705*
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
*संपर्क: 9421154594 7588868705*
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/
https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
