You are currently viewing रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब; सचिवपदी सुहास सातोसकर
Oplus_16908288

रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब; सचिवपदी सुहास सातोसकर

६ जुलै रोजी मळगाव येथे नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा

सावंतवाडी :

रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब, सचिवपदी सुहास सातोसकर आणि खजिनदारपदी प्रदीप शेवडे यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा सोमवार, ६ जुलै रोजी मळगाव येथील भगवती हॉल येथे संपन्न होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना मावळते अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. मागील वर्षभरात रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब आणि इनरव्हील क्लब सावंतवाडी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांसह एकूण ३३ सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण परब यांनी पुढील वर्षाचा मानस व्यक्त करताना सांगितले की, रोटरी क्लब सावंतवाडीने १ जुलैपासून नव्या कार्यकाळाची धुरा सांभाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली ५४ वर्षे कार्यरत असलेल्या या क्लबच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या, वंचित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचून सेवा कार्य करण्याचा आमचा संकल्प आहे.

आगामी काळात वाचन संस्कृती वाढविणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार असून, सावंतवाडी व दोडामार्ग भागातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव रो. सुहास सातोसकर, खजिनदार रो. प्रदीप शेवडे यांच्यासह अनंत उचगावकर, सत्यजित धारणकर, सुधीर नाईक, ॲड. जायबा धुरी आणि आबा कशाळीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा