You are currently viewing जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांची कलमठ गावाला भेट
Oplus_16908288

जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांची कलमठ गावाला भेट

आदर्श अंगणवाडी व बाजारपेठ शाळेची पाहणी; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

डिजिटल वर्ग, सीसीटीव्ही, भौतिक सुविधा व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर यांनी आज कलमठ गावाला भेट देत येथील मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात यश संपादन केलेल्या बाजारपेठ शाळेची तसेच आदर्श अंगणवाडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधांची माहिती घेतली.

भेटीदरम्यान सौ. नारकर यांनी शाळेतील सीसीटीव्ही व्यवस्था, डिजिटल वर्ग, भौतिक सुविधा, सुशोभीकरण, विद्यार्थीस्नेही वातावरण, वाय-फाय सुविधा, प्रयोगशाळा आदींची पाहणी केली. तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या आहाराचीही माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी बोलताना सौ. अनुराधा नारकर म्हणाल्या की, “कलमठ गावात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांविषयी आम्ही नेहमी ऐकत आणि वाचत होतो. मात्र आज शाळा आणि अंगणवाडीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर येथील कार्य अधिक प्रभावी असल्याचे जाणवले. कलमठ गावातील शाळा व अंगणवाडीचा विकास हा समाजासाठी दिशादर्शक आहे. शहरालगतचे गाव असूनही शाळेची पटसंख्या कायम राखण्यात शिक्षक आणि व्यवस्थापनाला यश आले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

तसेच “शैक्षणिक विकासच गावाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवतो,” असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, स्वप्नील चिंदरकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत, अनुप वारंग, नितीन पवार, पपू यादव, संतोष रेवंडकर, आबा कोरगावकर, प्रवीण सावंत, प्रणय शिर्के, अभिजित सावंत, अंगणवाडी सेविका पूजा हुन्नरे, प्रमोद पवार तसेच शुभांगी सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा