You are currently viewing सावंतवाडीच्या प्रभारी प्रांताधिकारीपदी वीरसिंग वसावे यांची नियुक्ती
Oplus_16908288

सावंतवाडीच्या प्रभारी प्रांताधिकारीपदी वीरसिंग वसावे यांची नियुक्ती

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्याच्या प्रभारी प्रांताधिकारी म्हणून वीरसिंग वसावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रांताधिकारी समीर घारे यांची प्रकृती बिघडल्याने ते सध्या रजेवर असून, काही दिवस हा अतिरिक्त कार्यभार तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता हा कार्यभार वीरसिंग वसावे यांच्याकडे देण्यात आला आहे.

वीरसिंग वसावे यांनी यापूर्वी सावंतवाडी तसेच कुडाळ येथे विविध पदांवर कार्य केले आहे. त्यानंतर त्यांची रत्नागिरी येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती. सध्या ते सहज जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

लोकांशी थेट संवाद आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी ओळख असलेल्या वसावे यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाचा अधिक प्रभावी लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा