You are currently viewing “राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व” निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम

“राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व” निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम

“राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व” निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम

सिंधुदुर्गनगरी

  राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त “राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व’ दि. २६ जुन ते दि. ३ जुलै २०२६ या कालावधीत साजरा केला जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे / उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. दरवर्षी विद्यार्थ्यांनी १२ वी मध्ये शिकत असताना ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक असते. “राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व” निमित्त दि. २६ जुन ते दि.३ जुलै २०२६ या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विशाल नाईक यांनी कळविले आहे.

            या विशेष मोहिमे अंतर्गत प्रत्यक्ष काही महाविद्यालयात शिबीराचे (कॅम्पचे) नियोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी  सदर कालावधीत कार्यक्रम हाती घेतला आहे.

            १२ वी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्कीटेक्चर, फार्मसी, कृषी, L.L.B, B.F.A, हॉटेल व्यवस्थापन अशा शाखेच्या उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. यासाठी त्यांना सी.इ.टी /निट/जे.इ.इ/नाटा अशा प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. प्रवेश प्रक्रियेसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशापूर्वी त्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जावर निर्णय घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देणे ही प्रक्रिया करण्यासाठी समितीला निर्णय घेण्यासाठी लागणारा कालावधी ३+२=५ (पाच) महिन्याचा आहे.

            ११ वी व १२ वी विज्ञान अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी https://ccvis.barti.in या संकेतस्थळावर CCVIS येथे ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्जाची पाटपोठ प्रिंट, मुळ कागदपत्रे व त्यांची साक्षांकित प्रत लवकरात लवकर विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी समिती कार्यालयात सादर करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा