सहकार सप्ताहाच्या शुभारंभादिनी सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्थेची स्थापना
प्रशिक्षण व संस्थांच्या बळकटीसाठी जिल्हा बँकेची ग्वाही
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बहुउद्देशीय संस्थेमार्फत वेगवेगळ्या संस्थांना कमी खर्चात प्रशिक्षण उपलब्ध होईल. त्यातून प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगाने निर्माण होतील. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी, सुविधा प्रशिक्षण केंद्र यासाठी जिल्हा बँक मदत करेल. सहकार मंडळ व बहुउद्देशीय संस्था एकत्रितपणे जिल्ह्यातील संस्थांना पुढे घेऊन जाण्यास मदत करतील. सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र आले पाहिजे त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांचा अनुभव सर्वांना मिळेल. त्यातूनच आपण जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी ओरस येथे केले. भारत सरकारच्या सहकार मंत्रालय स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा बँक येथे साजरा करण्यात आला.
सहकार सप्ताह शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकार ध्वजारोहण करून केलं. तसेच या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित सिंधुदुर्ग या नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेची सभा जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय सभा सभागृहात घेण्यात आली. संस्थेच्या सभा अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांची निवड यावेळी करण्यात आली. त्यांच्या हस्ते सहकार अभियान कार्यक्रमाचे दिप प्रज्वलीत करून शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमात प्रथम सहकार गीत गायनाने सहकार अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम सोहळ्यास माजी आमदार अजित गोगटे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहा निबंधक कुडाळ श्री. मरभळ, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिक्शक श्री हिरलेकर, कणकवली संस्था निबंधक श्री.आरेकर, बँक संचालक गजानन गावडे, दिलीप रावराणे, रवींद्र मडगावकर, प्रकाश मोर्ये, विठ्ठल देसाई, सौ.प्रज्ञा ढवण, गणपत देसाई, समीर सावंत, विद्याप्रसाद बांदेकर, तुळशीदास रावराणे, नासीर काझी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, नूतन बहूउद्देशीय संस्थांचे कार्यवाह संचालक मंडळ, सभासद, सहकार खात्यातील मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुउद्देशीय संस्थेच्या चेअरमनपदी, संदेश हडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपविधी, संस्थेचे कार्य, उद्देशाचे वाचन करण्यात आले
