You are currently viewing वटसावित्री
Oplus_16908288

वटसावित्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वटसावित्री*

८+८+८+८

 

आली ज्येष्ठी पौर्णिमा ही वटवृक्षाच्या पुजनासाठी

स्त्रिया निघाल्या नटुनी थटुनी सौभाग्याच्या

वाणासाठी

पैठणीवरी मोर नाचती नाकामध्ये नथ मोत्याची

कुंतली फुले कानी बुगड्या पैंजण पायी छुमछुम त्यांची

 

हाती चुडा छान अंगठी बोटामध्ये ती मासोळी

तबक पुजेचे तेही सजले हळदी कुंकू अक्षता जवळी नानापरिची फुले त्यामधी निरांजनी त्या फुलवाती

झाले सारे मनाप्रमाणे आनंदाला येई भरती

 

धागा वेढे वटवृक्षासी प्रार्थना करी मग देवाला

सख्या भेटल्या गप्पा झाल्या आनंदाला ऊतच आला

सावित्री जी झाली पूर्वी अजूनही ती येथे आहे

परंपरांचे येथे असणे स्रियांनीच ते जपले आहे

 

विद्या रानडे

प्रतिक्रिया व्यक्त करा