You are currently viewing बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव ” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव ” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

*बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव ” पुस्तकाचे थाटात प्रकाशन*

सावंतवाडी: सावंतवाडी येथील ज्येष्ठ लेखक बाळकृष्ण राणे यांच्या सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव या ललितलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक २७ जून रोजी सकाळी ११.०० वा. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत खेमसावंत भोसले राजेसाहेब आणि प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुधाकर ठाकूर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त प्रा. एम व्ही कुलकर्णी, प्रा.फातर्पेकर, प्रा.सुभाष गोवेकर, प्रा. गोडकर, जयप्रकाश सावंत, प्रा.शिंत्रे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, लेखक बाळकृष्ण राणे, सौ.राणे, विनय सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजक १९८२ सायन्स बॅचच्या वतीने हेमंत झांट्ये, ॲड गावकर, धरणे, सौ.सुखदा पेडणेकर, सौ.सुप्रिया गोडकर, सौ.अपर्णा झांट्ये, सौ गीता धरणे, सौ.शैलजा शिरोडकर, सौ.संपदा देसाई, सौ.ऋग्वेदिता देसाई यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक करताना प्रा.गोडकर यांनी १९८२ सायन्स बॅचच्या कार्याचा आढावा घेताना गेले वर्षभर कोकणातील साहित्यिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी लेखक बाळकृष्ण राणे यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याकरिता सदरचा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीचे त्यांचे पहिले पुस्तक सुद्धा १९८२ बॅचच्या वतीने प्रकाशित केल्याची आठवण देखील सांगितली. यावेळी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यामध्ये दीपक पटेकर (दीपी) यांनी बाळकृष्ण राणे हे कोमसाप सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे सांगताना ललित लेखन म्हणजे काय? यावर प्रकाश टाकताना ललित मधील सौंदर्यस्थळे, शृंगार याबद्दल सखोल माहिती दिली आणि बाळकृष्ण राणे यांच्या पुस्तकाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष पदावरून बोलताना राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी राणेंच्या पुस्तकाचे कौतुक करून आपल्या कॉलेजमधील माजी विद्यार्थी अशाप्रकारे यश मिळवत असल्याचा आनंद व्यक्त करून कॉलेजच्या रजिस्टर मध्ये अशा वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या साहित्यिक आदींची नोंद घेतली जाईल असे सांगितले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ.सुधाकर ठाकूर यांनी प्रथम ललित या विषयावर मार्गदर्शन केले आणि राणे यांच्या पुस्तकातील सावंतवाडीसह सावंतवाडीतील व्यक्तिचित्रणे, स्थळ यांची दिलेली माहिती हा महत्त्वाचा दस्तऐवज असून त्याचे पुस्तकाच्या माध्यमातून संवर्धन, जपणूक झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. एम व्ही कुलकर्णी, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. फातर्पेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक विनय सौदागर यांनी केले तर आभार प्रदीप पेडणेकर यांनी मानले. यावेळी श्री गोठोस्कर, अभय पंडित, प्रा. मर्गज, म्हसकर सर, अण्णा देसाई, सावंतबिर्जे, सुनील कोरगावकर, आरिफा शेख, संतोष मुंज, सुधीर शिरोडकर, नंदकुमार देसाई, अरुण देसाई यांच्यासह १९८२ बॅचचे विद्यार्थी, सुंदरवाडी ग्रुपचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शिंदे, प्रा. निकुम, प्रा.पाटील, प्रा.धुरी. प्रा.एस. व्हि.पाटील, प्रा.काळे यांनी मोलाची मदत केली.

_________________________
*संवाद मीडिया* 

*🎓 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्था*

*✨ श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) ✨*

*📚 सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित*
🏛️ मुंबई विद्यापीठ संलग्न

🏆 Best College Award (Rural) – University of Mumbai
🏅 NAAC “A” Grade (CGPA 3.06)
📜 ISO 9001:2015 प्रमाणित
🌟 अग्रणी महाविद्यालय – मुंबई विद्यापीठ

*🎯 शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेश सुरू*
——————————
*🎨 कला शाखा (B.A.)*

✔ इंग्रजी
✔ मराठी
✔ हिंदी
✔ अर्थशास्त्र
✔ भूगोल
✔ मानसशास्त्र

*🎓 एम. ए.*

✔ इंग्रजी
✔ हिंदी
✔ भूगोल

*🎓 पीएच.डी.*

✔ इंग्रजी
✔ हिंदी
✔ अर्थशास्त्र
—————————–
*💼 वाणिज्य शाखा*

📘 B.Com.

*✔ वाणिज्य*

🏦 B.Com. (Banking & Insurance)

*🎓 M.Com.*

✔ Advanced Accountancy
——————————–
*🔬 विज्ञान शाखा (B.Sc.)*

✔ रसायनशास्त्र
✔ वनस्पतीशास्त्र
✔ प्राणीशास्त्र
✔ भौतिकशास्त्र
✔ गणित
✔ Data Science

*🎓 M.Sc.*

✔ Computer Science
✔ IT
✔ रसायनशास्त्र
✔ वनस्पतीशास्त्र
✔ प्राणीशास्त्र
✔ भौतिकशास्त्र

*🎓 पीएच.डी.*

✔ रसायनशास्त्र
✔ वनस्पतीशास्त्र
✔ प्राणीशास्त्र
✔ भौतिकशास्त्र
—————————-

*🌟 महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*

✅ स्वायत्त महाविद्यालय
✅ संस्थानकालीन भव्य वास्तू व प्रशस्त इमारत
✅ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
✅ संशोधन केंद्र व पीएच.डी. मार्गदर्शक उपलब्ध
✅ नवोपक्रम व नवसंशोधन विभाग
✅ रोजगार व कौशल्य विकास केंद्र
✅ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
✅ लोककला व सांस्कृतिक विभाग
✅ सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका
✅ अत्याधुनिक प्रयोगशाळा व Computer Lab
✅ Language Lab
✅ मुलींसाठी वसतिगृह सुविधा
✅ अद्ययावत Gym व Shooting Range
✅ NSS | NCC (Army & Navy)
✅ DLLE | Career Katta
—————————-
*📸 विशेष Certificate Courses*

🎥 Photography
🇫🇷 French Language
🤖 Artificial Intelligence (AI)
——————————

*📞 प्रवेशासाठी संपर्क*

*🎨 कला विभाग*

📱 डॉ. सौ. पी. जी. नाईक *– 9422374329*
📱 डॉ. एस. एम. बुवा – *9422810226*

*🔬 विज्ञान विभाग*

📱 डॉ. जी. एस. मर्गज – *9420209013*
📱 डॉ. डी. बी. शिंदे – *7066175697*

*💼 वाणिज्य विभाग*

📱 डॉ. एस. ए. देशमुख – *7875582850*
📱 डॉ. सौ. एस. जे. जाधव – *9922771024*

*👨‍🏫 प्राचार्य*

*श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त)*

*✨ उज्ज्वल भविष्याची खात्री… गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा! ✨*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204513/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
 

प्रतिक्रिया व्यक्त करा