*ज्येष्ठ कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हट्टी ढगोबा!*
ढगोबा, ढगोबा किती तू रुसतोस
मोठ्या माणसांच्या चुकीची शिक्षा
आम्हाला कां रे उगाचच देतोस?
शोधायला तुला आणू कां रे रिक्षा.
☁️
अजून तुझ्यात भरलीय पांढरी हवा
आकाशात कापूस पिंजलाय जसा तुझ्यासाठी आणतो,कोकणचा मेवा
पाण्याने ढग भरुन लवकर ये असा.
☁️☁️
काळ्या, सावळ्या मेघांची होते गर्दी
दूर डोंगरावर पसरतो जेव्हा अंधार
आईला वाटते आम्हाला होईल सर्दी
उगाच करते मग औषधाचा भडिमार.
☁️☁️☁️
पण खरं सांगू कां तुला, करमत नाही
पावसातली मजाच कितीअसते भारी तुझ्याशिवाय खेळात गम्मत येत नाही
कधी येणार ढगोबा रमतगमत स्वारी.
☁️☁️☁️☁️
आला नाहीस तू तर रुसून बसू आम्ही
कट्टी फू करुन घरातच खेळत राहू
पावसाची झिम्माड शॉवरखाली करु
खोट्या पैशाची गम्मत आम्हीच पाहू.
☁️☁️☁️☁️☁️
सोडू होड्या टबात, रेनकोट उन्हात
छत्री घेऊन फिरु,दप्तर घेऊ पाठीवर
आमचीच गम्मत,अन् जम्माडीजम्मत
हट्टीढगोबा,आम्हीरागवलोत तुझ्यावर
☁️☁️☁️☁️☁️☁️
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर,
कलाशिक्षिका.
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
*👇अभ्यासक्रम*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
*संपर्क : 8600879426 7588868705*
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
*संपर्क: 9421154594 7588868705*
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/
https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
