You are currently viewing जुळले धागे प्रीतीचे
Oplus_16908288

जुळले धागे प्रीतीचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जुळले धागे प्रीतीचे* 

 

लाडकी माझी प्रिया

वसते मनमंदिरा

खळी उमटते गाली

पाहता समोर चेहरा

 

हृदय मंदिरात वसे

छबी सुंदर प्रीतीची

हवीहवीशी वाटते

नाजुकशी काया तिची

 

गालावरती हसू तिच्या

वाटते पाहत राहावे

नजर काढू किती तिची

दृष्ट कोणाचीच न लागावे

 

जणु शुक्राची चांदणी

ढगावरी चकाकते

कौमुदीत पौर्णिमेच्या

लख लखत नाहते

 

विसावते खांदयावर

दिलखुलास हसते

हृदय मंदिरात माझ्या

एकटीचं ती नांदते

 

*जुळले धागे प्रीतीचे*

असते माझ्या सवे

कवी कल्पनेत मी

गातो तिचेच गोडवे

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा