मुंबई :
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील ‘वर्षा’ या मुख्यमंत्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स (X) हँडलवरूनही नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!” अशा शब्दांत त्यांनी सकाळी ट्विट करून शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या.
त्यानंतर वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आशीर्वाद घेतले.
