You are currently viewing शितल एजन्सीचे दिमाखदार उद्घाटन संपन्न

शितल एजन्सीचे दिमाखदार उद्घाटन संपन्न

शितल एजन्सीचे दिमाखदार उद्घाटन संपन्न

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती, व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली 

येथील शितल एजन्सीचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संदेश पारकर प्रेमी, व्यापारी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजित नाडकर्णी यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या नगरसेवक कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. नवीन एजन्सीची पाहणी केल्यानंतर संदेश पारकर यांनी उद्योजकांचे अभिनंदन करत व्यवसायाच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आयोजकांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांचा उल्लेख करत, अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी शुभांगी यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा