You are currently viewing NAB सिंधुदुर्गतर्फे लाभार्थींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

NAB सिंधुदुर्गतर्फे लाभार्थींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

NAB सिंधुदुर्गतर्फे लाभार्थींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

20 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन; 23 जून रोजी होणार वितरण

सावंतवाडी :

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) सिंधुदुर्ग, भटवाडी-सावंतवाडी यांच्या वतीने लाभार्थींच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, छत्री आदी साहित्याचा समावेश असणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आपले अर्ज दि. 20 जून 2026 पर्यंत NAB कार्यालयाकडे सादर करावेत. अर्जासोबत विद्यार्थ्याचा निकाल (रिझल्ट), शाळेचा दाखला तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्याची माहिती जोडणे आवश्यक आहे.
सर्व NAB लाभार्थ्यांनी या उपक्रमाची नोंद घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त अर्जांच्या आधारे दि. 23 जून 2026 रोजी शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
ही माहिती NAB सिंधुदुर्गचे सचिव श्री. सोमनाथ जिगजी तसेच अध्यक्ष श्री. अनंत उचगावकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा