You are currently viewing उभा पांडुरंग
Oplus_16908288

उभा पांडुरंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*उभा पांडुरंग…*

 

चंद्रभागा तीर उभा पांडुरंग

भजनात दंग.. वारकरी

रखुमाई पाहे चंद्रभागा वाहे

भक्तिरसी न्हाए..भीमातीर…

 

अवघाच देह झाला पांडुरंग

नित्य त्याचा संग.. रोमरोमी

कीर्तनात टाळ जुळे त्यासी नाळ

अरे बा सांभाळ..जगजेठी…

 

अवघेची विश्व तारलेस देवा

वाटे तुझा हेवा.. जगन्नाथा

कान्होपात्रा,जनी जाहली उन्मनी

गोवरीत ध्वनी.. देवा तुझा…

 

सकल पालक ब्रीद तुझे देवा

घडो तुझी सेवा.. मागतो मी

गुण गाता तुझे दिसते रुपडे

भक्त हे भाबडे.. देवा तुझे..

 

तार तू वा मार खुले तुझे द्वार

अवघेची सार.. तूच देवा

कर्म मीच केले तुला अर्पियेले

आता फुलझेले.. पाठवी बा..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३५९५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा