You are currently viewing पाहून थकले वाट तुझी
Oplus_16908288

पाहून थकले वाट तुझी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाहून थकले वाट तुझी*

 

टळून गेली वाट रोजची

पाहुनी थकते प्रिया तुझी

माळून गजरा मोगऱ्याचा

दिवसभर होते जरी बिझी

सवय असली जरी रोजची

दिवस आहे आजचा खास

नको येऊ तू मागील दाराने

*बाळ झोपलाय बिनधास*

काढून सर्व भांडी चांदीची

पाटही मांडलाय चंदनाचा

मांजर करतंय रक्षण बाजूला

घास खाणारे तुझ्या हातचा

मनीषा म्हणून प्रेम करतोस

अंदाज आलाय आईंना तुझा

नसून आपला “प्रेम विवाह”

बाळ मोडणार *पण* तुझा

बरे नव्हे हे *उशिरा येणे*

उगाच टाकतोस कोड्यात

फोन करावा निघण्याआधी

उगाच ताटकळते गॅलरीत

उभे रहाणे हे *रोज असे*

नाही शोभत खानदानात

विषय होतो *चघळायला*

चेष्टा करती नातेवाईकांत

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मोबाईल/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा