You are currently viewing दीपक पटेकर (दीपी) यांना श्री शब्दलालित्य समूहातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

दीपक पटेकर (दीपी) यांना श्री शब्दलालित्य समूहातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

*श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) यांना समूहाकडून कवयित्री शब्दवैभवी पल्लवी उमरे यांनी वाहिलेलं वाढदिवसाचे शुभेच्छा पुष्प*

दीपक पटेकर (दीपी) यांना श्री शब्दलालित्य समूहातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

शारदेचा उपासक ,वारकरी साहित्याचा
उंचावतो ध्वज यशाचा,दरवळे सुगंध किर्तीचा /

शब्द लालित्य निपूण,असीम ते कलागुण
सुवास पसरे शब्दातुनी ,बकुळीच्या फुलांचा
शिखरे यशाची गाठावी, उच्च सन्मान सत्काराचा
दरवळावा सुगंध दुरदूर ,पसरावा किर्तीचा /

तेजोवलय मुखावरी ,शब्द अंतरीचे गुंजती
तव वाग्बाणांनी कैक संमेलने गाजती
काव्यदीप कर्तुत्वाचा,संपादक संवाद मिडियाचा/
दरवळावा सुगंध दुरदूर ,पसरावा किर्तीचा

शब्दांशी खेळतो लीलया,आईबाबांची पुण्याई
प्रतिभेचे धनी, अलौकिक ,काळजात विठाई /

लाभला वरदहस्त प्रबळ, सिद्धहस्त लेखणीचा
नक्षत्रांनी सजावे अंगण,करास्वीकार शुभेच्छांचा
दरवळावा सुगंध दुरदूर ,पसरावा किर्तीचा/

©® पल्लवी उमरे( शब्दवैभवी)

प्रतिक्रिया व्यक्त करा