मोदी @12 निमित्त तरंदळे धरण परिसरात स्वच्छता अभियान
भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग; पर्यटनस्थळ स्वच्छ ठेवण्याचा दिला संदेश
कणकवली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “मोदी @12” उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीने तरंदळे धरण परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या स्थळी स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करत पर्यटकांनाही स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
कणकवली तालुक्यातील विकसित होत असलेल्या प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या तरंदळे धरणावर दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. या पर्यटनस्थळाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने भाजप कार्यकर्त्यांनी श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबविली.
यावेळी भाजप मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपाध्यक्ष संदीप सावंत, कणकवली पंचायत समिती सदस्य संजना राणे, समीर प्रभुगावकर, महेश सावंत, तरंदळे सरपंच सुशील कदम, युवा मोर्चा अध्यक्ष सर्वेश दळवी, अभय गावकर, सुदर्शन नाईक, उपसरपंच शुभावली सावंत, बूथ अध्यक्ष संदेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुनीलदत्त जाधव, डॉ. सत्यवान राणे, राजाराम सावंत, गजानन सावंत, किरण सामंत, यशवंत इकाळे, संतोष कदम, बाजी सावंत, वेदान कदम, भीमसेन दळवी आदी उपस्थित होते.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपले पर्यटनस्थळ, गाव आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. :::
