You are currently viewing वसुंधरेचा शालू
Oplus_16908288

वसुंधरेचा शालू

*ज्येष्ठ साहित्यिका कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वसुंधरेचा शालू*

 

वसुंधरेच्या शालूवरती रंग बावरी

सजली सुंदर नक्षी,

पंखावरचे रंग पिसारित नीलांबरी

धुंदीत उडाले पक्षी।। १।।

 

मेघांच्या दाटीतून किरणांच्या येती

धवल प्रखर रेखा,

अवनीवरच्या सुंदर सोहळ्यातघेती

सहभाग अनोखा।। २।।

 

रम्य या वातावरणी,अनिलसैरावैरा

ज्याला त्याला सांगे,

धरित्रीचा शालू सुगंधकुपी नजारा

शोभे विविध रंगे।। ३।।

 

हिरव्याकंच, पोपटी रंगछटांवरती

उधळण नक्षीदार ती,

विविधाकारे नयनरम्य पुष्पेखुलती

नृत्यमयुर पदरावरती।। ४।।

 

लाजलाजूनी वसुधा मोहरली मनी

निसर्गाच्या बक्षिसाने,

किती दिधले तिजला रम्य सुंदरसे

नजराणे कौतुकाने।। ५।।

 

परि न तिनेकधी केला गर्वाभिमान

दिधले स्वहस्ते दान,

रोज नवांकुरे वृक्षल्लरी शेतजमीन

करीत निसर्ग सन्मान।। ६।।

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा