You are currently viewing माय बाप…

माय बाप…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य, श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माय बाप…*

 

डोळ्यात बापाच्या मला सुखदुःख सारे काय दिसते

अन् पापणी लवताच माझी राबणारी माय दिसते

 

ओठांवरी मी शब्द सात्विक गोड हासू पाहिलेले

जाता तिचे मग प्रेम ऊतू ती दुधाची साय दिसते

 

ती सोसते, ना दावते, ती एकटी लढते जगाशी

तेव्हा तिचे ते वागणे केवळ मला असहाय्य दिसते

 

वात्सल्य ममता आणि प्रेमे लेकरा गोंजारिते ती

आई मधे ही वासरासाठीच वेडी गाय दिसते

 

आयुष्य अवघे वेचले संसार सुख देण्या तिने जर

चिंता नको कुठली तिचे आयुष्य पण दीर्घाय दिसते

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा